लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.जिल्हा काँग्रेस कमिटी व मित्र परिवाराच्या वतीने वडेट्टीवार यांच्या स्वागताची तयारी गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. इंदिरा गांधी चौकापासून चारही मुख्य मार्गावर फलक लावून पक्षाच्या वतीने वातावरण निर्मिती करण्यात आली. आमदार वडेट्टीवार व खा.धानोरकर यांचे स्वागत होताच अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पोरेड्डीवार, जि.प. सदस्य अॅड.राम मेश्राम, प्रा. राजेश कात्रटवार आदीसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांचे चाहते उपस्थित होते.काँग्रेसची ही स्वागताची रॅली चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी ७.२० वाजतापर्यंत पोहोचली. त्यानंतर येथे जाहीर सत्काराचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी विविध संघटना तसेच वडेट्टीवार मित्र परिवाराच्या वतीने ना.वडेट्टीवार व खा.धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
वडेट्टीवार व धानोरकरांचे जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:14 AM
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देचौकातून रॅली : कार्यकर्त्यांची तोबा गर्दी