निवेदनात म्हटले आहेे की, देसाईगंज हे शहर रेल्वेमुळे दोन भागात विभागले गेले असून प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना बाजारात यावे लागते, रेल्वेने लहान वाहनांसाठी बोगदा तयार केला असल्यामुळे मोठी वाहने यातून आवागमन करू शकत नाहीत, अशा वाहनांसाठी ब्रह्मपुरी रोड ते कब्रस्थान व विश्रामगृह अशी वाहने आणावी लागतात.
या मार्गाचे काम लवकरच सुरू करून समस्येचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष दंडवते यांनी दिले आहे. निवेदन देताना समाजवादी पार्टीचे देसाईगंज तालुका अध्यक्ष फैजान पटेल, उपाध्यक्ष दानिश सय्यद, सचिव प्रीतम जनबंधू, जिल्हासचिव कैलाश बगमारे, जिल्हा उपाध्यक्ष आमिर याशीनी, तवंगर कुरेशी, जिब्राईल शेख, फैजाण खान, नरेश वासनिक, राहुल सिडाम, गुरुप्रीत सिंह पवार आदी उपस्थित होते. परंतु सध्या या मार्गाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.
(बॉक्स)
खड्ड्यांचा अंदाजच येत नाही
ब्रह्मपुरी बायपास मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी वाहनचालकांना तर अक्षरशः मोठी कसरत करावी लागते.