चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उघडून त्यातील गिट्टी, मुरूम निघाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक येतात. आता ऑगस्ट महिन्यात श्रावण मासपर्व सुरू असल्याने दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात. मात्र, रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडादेव तीर्थस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. याची दखल घेऊन या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी मार्कंडादेव येथील नागरिक व भाविकांनी केली आहे .
चामोर्शी- मार्कंडादेव, चामोर्शी- शंकरपूर हेटी, तसेच फराडा व मार्कंडा देव, फोकुर्डी- मार्कंडादेव, चाकलपेठ क्राॅसिंग व्हाया मार्कंडादेव मार्गाने दररोज भाविक येत असतात. जड वाहनांच्या आवागमनाने या रस्त्याची पूर्णत: वाट लागून खड्डे पडून गिट्टी उखडली आहे. त्यामुळे रस्त्याची नव्याने बांधकाम करण्याची मागणी मार्कंडादेव येथील नागरिक व भाविकांनी केली आहे.
240821\img_20210816_124805.jpg
मार्कडादेव रस्ता फोटो