शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

९१ गावांना विद्युतीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:06 AM

राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षानंतरही जैसे थे : धानोरा, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या गावांमध्ये महावितरणचा उजेड के व्हा पडेल याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.जिल्ह्यात एकंदरी १ हजार ५१५ गावे आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १०७, धानोरा २१९, चामोर्शी १८६, मुलचेरा ६७, देसाईगंज ३१, आरमोरी ९१, कुरखेडा १२०, कोरची १२५, अहेरी १५८, सिरोंचा २१५, एटापल्ली १८६ व भामरागड तालुक्यात ११० गावे आहेत. महावितरण कंपनीच्या वतीने विद्युतीकरण मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे काही गावापर्यंत विद्युत तारा पोहोचविणे जिकरीचे होऊन बसल्याने अशा गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र देखभाल-दुरूस्तीअभावी अनेक गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा बंद पडला.प्राप्त माहिती नुसार धानोरा तालुक्यातील २१९ गावांपैकी १९१ गावात विद्युतीकरण झाले. मुलचेरा तालुक्यातील ६७ पैकी ६४, कुरखेडा तालुक्यातील १२० पैकी ११८, कोरची तालुक्यातील १२५ पैकी १२४, अहेरी तालुक्यातील १५८ पैकी १४६, सिरोंचा तालुक्यातील ११५ पैकी १११, एटापल्ली तालुक्यातील १८६ पैकी १५३ व भामरागड तालुक्यातील ११० पैकी १०२ गावात विद्युतीकरण झाले आहे.चार तालुक्यात १०० टक्के विद्युतीकरणगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यातील सर्वच गावात १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील दोन, कोरची तालुक्यातील एक, मुलचेरा तालुक्यातील तीन, सिरोंचा तालुक्यातील चार गावांचे विद्युतीकरण झाल्यानंतर ही गावेसुद्धा १०० टक्के विद्युतीकरण झालेल्या तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होणार आहेत.