शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

शेतकऱ्यांना ३४.५५ कोटी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:49 AM

केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली.

ठळक मुद्देमावा-तुडतुडे व बोंडअळीने नुकसान : २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय मागे घेण्याच्या घोषणेने दिलासा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी आधीच्या निकषानुसार दिली जाणारी ३४ कोटी ५५ लाखांची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.यावर्षी खरीप हंगामात पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने रोगांनी ग्रस्त कापूस व धानाच्या पिकांसाठी ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शासन निर्णय काढून अहवालसुद्धा शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र यादरम्यान २३ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात शासनाच्या मदतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अट घालण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात केवळ चामोर्शी, मुलचेरा व भामरागड या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरले होते. मात्र यामुळे विदर्भात नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्यामुळे विरोधी आणि काही सत्ताधारी आमदारांनीही तो निर्णय मागे घेऊन जुन्या निकषांप्रमाणेच मदत द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार २३ फेब्रुवारीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात विधीमंडळात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी ३४ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. मात्र सरकारकडे ही मदत देण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे या मदतीसाठी केंद्र सरकारपुढे हात पसरण्यात आले असले तरी केंद्राने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकार मदतीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही का? असा शंकात्मक प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकºयांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ही मदत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.पाठपुराव्याला यश२३ फेब्रुवारीचा जीआर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देण्यापासून वंचित ठेवणारा होता. त्यामुळे तो जीआर रद्द करावा. यासाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच सर्व शेतकºयांना मदत मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.- कृष्णा गजबे, आमदार, आरमोरी