लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात मजुरांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द, हालेओला, रेकानमेटा, खरगी, मारकागुडम आदी पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या हंगामातील मजुरी मिळाली. परंतु बोनस रक्कम मिळाली नाही. याविषयी मागील तीन वर्षांपासून गावातील मजुरांनी प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज करून थकीत बोनस मिळवून देण्याची मागणी केली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. मजुरांनी तेंदू हंगामात हालअपेष्टा सहन करून तेंदू संकलन केले. परंतु त्यांच्या श्रमाचा पैसा गेला कुठे, असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. तेंदूपत्ता बोनसची रक्कम अप्राप्त असल्याने आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे, असा आरोपही मजुरांनी केला आहे. त्यामुळे लवकर बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी मजुरांच्या वतीने करण्यात आली. जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना बंटी जुनघरे, उलगे तिम्मा, चंद्रा तुमरेटी, झुरू दुर्वा, गोसू कोरसा, संतोष नरोटे, अशोक तिम्मा, सोनू हेडो, प्रभू गोटा, शिवाजी दुर्वा, संजय कोरसा उपस्थित होते.तीव्र आंदोलन करणार२०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केल्यानंतर त्याचवर्षी दिवाळीपर्यंत तेंदू बोनस मिळणे मजुरांना अपेक्षित होते. परंतु असे झाले नाही. बोनस मिळण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. मागील तीन वर्षापासून प्रलंबित असलेले बोनस न दिल्यास आंदोलन छेडू, असा इशारा पाच गावातील मजुरांनी तालुका व जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
तेंदूपत्ता बोनसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:08 AM
तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे.
ठळक मुद्देतीन वर्ष उलटले : एटापल्ली तालुक्यातील मजूर वंचित