शहरं
Join us  
Trending Stories
1
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
2
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
5
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
6
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
7
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
8
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
9
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
10
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
11
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
12
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
13
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
14
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
15
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
17
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
18
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
19
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
20
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली

वनपाल, वनरक्षकांचे वेतन वाढविणार

By admin | Published: May 28, 2017 1:23 AM

मागील अनेक वर्षांपासून वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

 वनमंत्र्यांचे आश्वासन : वनपाल-वनरक्षक संघटनेचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वन विभागातील वनपाल व वनरक्षकांचे वेतनवाढ करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली. वनपाल व वनरक्षकांची वेतनवाढ केली जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले. गडचिरोली येथे वन भवनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असता त्यांना पदोन्नत वनपाल व वनरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. मागील अनेक वर्षांपासून वेतन वाढ झाली नाही. वेतनवाढीसाठी संप व आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनपाल व वनरक्षकांचे वेतन वाढवू, असे आवासन संघटनेला दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वनपाल व वनरक्षक यांच्या वेतन श्रेणीत वाढ करावी. यासाठी विरोधी पक्षात असतांना विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला होता. मागील सहा वर्षांपासून वेतन वाढीसाठी संघटनेचा लढा सुरू होता. त्या लढ्याला यश येण्याची चिन्हे आहेत. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पेंदोरकर, सुनील सोनटक्के, मोतीराम चौधरी, प्रभाकर अटकरी, सुनील पेंदोरकर व वनकर्मचारी उपस्थित होते.