यात तालुका अध्यक्षपदी रोशन नैताम, सचिव अल्का डांगे, सहसचिव जगन्नाथ भांडेकर, जीवनदास किनेकार, पंढरीनाथ चुनारकर, उपाध्यक्ष संगीता डांगे, संघटक नंदा मोगरे, मीना बोदलकर, सहसंघटक चंदा खेडेकर, कोषाध्यक्ष एकनाथ कुनघाडकर यांची निवड करण्यात आली. सभेत वारकरी संप्रदाय तसेच संतांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुक्यातील गावागावात वारकरी साहित्य परिषद शाखा स्थापन करून त्या माध्यमातून वारकरी संप्रदाय मंडळाचे विचार पोहचविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेला माया लाड, पुष्पा देशमुख, सुचिता डांगे, भय्याजी बट्टे, बोंडकू बुरे, तुळशीराम राऊत, रामभाऊ गटलेवार, रोहिदास धोटे, भास्कर चंदनखेडे, मोरेश्वर सोमनकर, मनोहर सातपुते, दिलीप चौधरी, भाऊजी बोरकुटे आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक पुरुषोत्तम राऊत, संचालन माया लाड यांनी केले तर आभार शंकर बारसागडे यांनी मानले.
220921\2858img-20210922-wa0141.jpg
वारकरी कार्यकारीणी फोटो