बीडीओंना निवेदन : संघटनेची मागणी कोरची : तालुक्यातील जलसुरक्षकांचे मानधन मागील दोन वर्षांपासून अदा करण्यात न आल्याने जलसुरक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रखडलेले मानधन तत्काळ वितरित करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जलसुरक्षकांचे मानधन दोन वर्षांपासून अदा न करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानधन निकाली काढण्यासंदर्भात पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ मानधन निकाली काढावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना नवरगाव येथील विलास उईके, बेडगाव येथील वाल्मिक किरसान, जांभळीचे रामू नैताम, नांदळी येथील बळीराम मडावी, बोगाटोलाचे आर. आर. नैताम, राजेश कुंजाम, एस. आर. बोगा, आर. एस. गोटा, योगेश बोदेले, कृष्णा उईके, सुगेन मडावी, डी. एम. उईके, कुसन मडावी, गुलाब साहारे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जलसुरक्षकांचे मानधन दोन वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 2:30 AM