शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

लोकसहभागातूनच जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:32 PM

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलजागृती सप्ताहाचा समारोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. तेव्हा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृध्दीकडे जाण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समाजसेवक देवाजी तोफा, प्राचार्य सविता सादमवार, प्राचार्य संजय नार्लावार, मनोहर हेपट, संदीप लांजेवार, कार्यकारी अभियंता अ.अ. मेश्राम आदी उपस्थित होते.लोकांपर्यंत पोहचून जनआंदोलनाच्या माध्यमाने जल जागृतीपर संदेश द्या, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. पाण्याचा गैरवापर टाळून मोजक्याच पाण्याने आपली गरज भागवा असेही आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा बोलतांना म्हणाले की,&‘आम्ही भारताचे लोक’ जलसंवर्धन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. पाण्याचे नियोजन चुकत असल्यामुळे येणारा काळ भयंकर स्वरुपाचा असेल याची जाणीव आजच होत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात महिलांचा सहभाग गरजेचा आहे. सर्वांच्या मनस्थितीत बदल झाल्याशिवाय परिस्थीतीत बदल होणार नाही, असे आवाहनात्मक मत व्यक्त केले.प्राचार्य सविता सादमवार म्हणाल्या की, मनाने एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला यश येत नाही. आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला मानव ओरबाडून नियम तोडत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीचा अर्थ आम्ही समजून घेतला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीला वाळवंटाचा ग्रह म्हणून ओळखला जाईल असा इशारा त्यांनी दिला. संचालन डी. वाय. भांडेकर यांनी तर आभार सहायक अभियंता डी. डी. समर्थ यांनी मानले.विजेत्या स्पर्धकांचा गौरवजलजागृती सप्ताह १६ मार्च २०१४ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आला. यादरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता आदित्य जयदेव गेडाम, व्दितीय प्रतिक्षा यशवत गोडणे आणि तेजस तानाजी भेंडारे व तृतीय ओम अशोक पुन्नमवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.