वन विभागाचा उपक्रम : फ्लोराईडची समस्या होणार कमीचामोर्शी : तालुक्यातील कालीनगर येथे फ्लोराईडयुक्त पाणी असल्यामुळे याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यावर वन विभागाने उपाय शोधत गावातील १ हजार २०० कुटुंबांना वॉटर फिल्टरचे वितरण केले. त्याचबरोबर सदर वॉटर फिल्टरचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही गुरूवारी करून दाखविले. कालीनगर येथील सर्वच हातपंप व विहिरीतून फ्लोराईडयुक्त पाणी येते. इतर कोणतेही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने नागरिकांना हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांचे दात पिवळे पडणे, प्रौढ व्यक्तींना सांधेदुखी, पोटाचे आजार आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता वन विभागाने या गावातील प्रत्येक कुटुंबाला वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले आहे. सदर वॉटर फिल्टरचा वापर कशा पद्धतीने करावा, याचे प्रात्यक्षिकसुद्धा प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. त्याचबरोबर फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याबाबतचीही माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिले. वन विभागाच्या या उपक्रमाविषयी नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. सदर उपक्रम आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आला. यासाठी मार्र्कं डा (कं.) चे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एन. तनपुरे, गुंडापल्लीचे क्षेत्रसहायक एम. एस. कोवे, नियतक्षेत्र वनरक्षक जी. एस. पस्पुनुरवार यांच्यासह मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
कालीनगर येथे वॉटर फिल्टरचे वाटप
By admin | Published: December 27, 2015 1:49 AM