धानोरा : उन्हाळ्यात जनावरे पाण्यासाठी भटकंती करतात. पशुपक्षी तसेच वन्यप्राण्यांना पाण्याची साेय व्हावी, यासाठी तुकूम येथील नागरिकांनी दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावालगतच्या बोरिया नदीपात्रात खड्डा खानून पशुपक्षी व जनावरांसाठी पाण्याची सोय केली. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस पडूनही नदीनाल्यांमध्ये पाणी अडवण्यासाठी सोय नसल्याने पावसाचे संपूर्ण पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यापूर्वीच अनेक नदी-नाले कोरडे पडतात. त्यामुळे वन्यप्राणी व पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा पक्षी व जनावरांना धाेका हाेऊ शकताे. ही बाब ओळखून ग्रामपंचायतचे सचिव राजेश दोनाडकर यांच्या पुढाकाराने गावातून लोकवर्गणी जमा करून दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून बोरिया नदीपात्रात खड्डा खोदण्यात आला. वन्य प्राणी पाळीव प्राणी तसेच पशु-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. याकरिता देवाजी तोफा, बाबूराव तोफा, श्रीराम मुंडले, बाबूराव मेहर, कवडू मेहरा, अरुण विहार, सोनू दुर्वा, दुधराम सयाम, भोजराज सिडाम, रवींद्र मेश्राम, अंबादास मेहर, बळीराम मोटघरे, चंदू उसेंडी व नागरिकांनी सहकार्य केले.
लोकवर्गणीतून जनावरांसाठी केली पाण्याची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:34 AM