धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थेच आहे. येथील अनेक प्रभागात उन्हाळ्यात बोरवेल, विहिरी आटतात. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. शहराशी लोकसंख्या दरवर्षी वाढतच आहे. परंतु पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या काळापासून आहे तीच आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. तसेच नळाला सुद्धा पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. याचा फटका नागरिकांना बसते. येथील नवा प्लॉट प्रभाग क्रमांक ११ मध्ये नळ कनेक्शन नाही. तसेच उन्हाळा सुरू होताच अनेकांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या प्रभागातील महिलांनी पाण्याची समस्या घेऊन मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे यांची भेट घेतली. त्यांची समस्या लक्षात घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.
धानाेरात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:32 AM