लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गडचिरोली पोलीस दलाने कटेझरी गावात पाण्याची टाकी उभारली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २९ मे रोजी कटेझरी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यादरम्यान पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत असल्याची बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले होते. या आश्वासनांची १५ दिवसात पूर्तता करीत पोलीस दलाने बोअरवेल खोदून दिला. या ठिकाणी पाणीपंप बसविण्यात आले. जवळच लाकडांचा मनोरा तयार करून त्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली. पंपाने टाकीमध्ये पाणी टाकून ते पाणी नळाद्वारे ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. कटेझरीतील आबाल वृध्दांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. योजनेचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठीत नागरिक भिमा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अक्षय कुमार गोरड, पीएसआय सागर वरूटे, जगन्नाथ मेनकुदळे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
पाण्याची भटकंती थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:34 PM
गडचिरोली पोलीस दलाने कटेझरी गावात पाण्याची टाकी उभारली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २९ मे रोजी कटेझरी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
ठळक मुद्देपोलीस दलाचा उपक्रम : कटेझरीत उभारली पाणी टाकी