शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आश्रमशाळेला मिळणार पाणी

By admin | Published: February 13, 2016 12:53 AM

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील येंगलखेडा येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते.

स्वतंत्र पाणी योजना : येंगलखेडा आश्रमशाळेतील पाणी समस्या सुटणारमालेवाडा : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील येंगलखेडा येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेला पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार केली जाणार आहे. याजेनेच्या विहिरीचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य निर्मला पारसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एम. टी. भोवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सयाम, ग्राम पंचायत सदस्य कोमेश्वर धोंडणे, महिला अधीक्षिका सी. आर. पसीने, सगनू नरोटे, मनाबाई नरोटे, प्रकाश नरोटे, हरबा सलामे, रामसाय होळी, वाय. एन. झंझाळ, बी. एस. राऊत, बी. टी. वालदे, गुणाजी मडावी, उमाकांत बावनथडे, शाखा अभियंता व्ही. एस. कोल्हे, विजय चौधरी उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने टाकी बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. आश्रमशाळेपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये विहिरीचे खोदकाम केले जात आहे. तेथून शाळेच्या आवारात पाईपलाईन टाकली जात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. इतरही महिन्यांमध्ये अपुरा पाणी मिळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे या आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बांधण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात होती. या मागणीची दखल घेत आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. (वार्ताहर)