शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

कोरोनासोबत जगणे शिकलो, आता वाघासोबतही जगूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:40 AM

संपूर्ण गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्यामुळे समस्त नागरिकांनी वाघापासून बचावाचा कानमंत्र लक्षात ठेवल्यास हल्ला आणि त्यात बळी जाण्याच्या घटना टाळता ...

संपूर्ण गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्यामुळे समस्त नागरिकांनी वाघापासून बचावाचा कानमंत्र लक्षात ठेवल्यास हल्ला आणि त्यात बळी जाण्याच्या घटना टाळता येणार आहेत. कोणत्या सूचनांचे पालन करावे याची माहिती देणारे जनजागृतीपर पोस्टर वन विभागाने गावागावात लावले आहेत.

जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. या हल्ल्यांच्या घटनांवर नजर टाकल्यास बहुतांश हल्ले हे परवानगीशिवाय प्रवेश न करता येणाऱ्या राखीव जंगलात झाल्याचे दिसून येते. कोणत्याही वाघाने गावात किंवा गावाशेजारी येऊन हल्ला केलेला नाही. त्यामुळे या घटनांसाठी काही प्रमाणात मानवीय चुका जबाबदार ठरत आहेत. जंगलात जाणे ही जिल्ह्यातील नागरिकांची अपरिहार्यता असली तरी जंगलात वावरताना काही नियम पाळल्यास वाघांचे हल्ले टाळणे शक्य होणार आहे.

(बॉक्स)

एका वाघाला पकडल्यास दुसरा तयार होईल

मोठे वनक्षेत्र असूनही गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षे वाघांचे अस्तित्व नव्हते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्यामुळे दोन वर्षांपासून ब्रह्मपुरी भागाकडून काही वाघ गडचिरोली जिल्ह्याकडे वळले आहेत. अनेक वर्षे हिंस्र पशू नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक बिनधास्तपणे जंगलात वावरत होते. त्यामुळे वाघांच्या सवयी, स्वभाव याची कल्पना नसल्यामुळे त्याच्या हल्ल्यापासून बचाव कसा करायचा, याची माहिती नागरिकांना नाही; परंतु आता ही माहिती जाणून घेणे गरजेचे झाले आहे. वन विभागाकडून हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. दोन वर्षांत वाघांची संख्या वाढल्यामुळे कोणाकोणाला पकडणार? असा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.

(बॉक्स)

वाघाच्या हल्ल्यांसाठी जबाबदार कोण?

- अनेक नागरिकांनी शेतीचे क्षेत्र वाढवत वनजमिनीवर अतिक्रमण केले आहे. शेतात जाण्यासाठी पूर्वीचा पांदण रस्ताही ठेवला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना जंगलाच्या वाटेने शेतात जावे लागले. गुरांची चराईसुद्धा जंगलात केली जाते. त्यामुळे वाघांचे हल्ले होत आहेत.

- विशेष म्हणजे वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागली, तो माणसांच्या नरडीचा घोट घेतो असे म्हटले जाते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांनी सांगितले. वाघ केवळ श्वास रोखून मारण्यासाठी मानेला जबड्यात पकडतो. माणसाचे मांस त्याला आवडत नाही. तसे असते तर वाघांनी गावांमध्ये येऊन माणसांवर हल्ले केले असते, असे वन विभागाने स्पष्ट केले.

वाघापासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी

१) नागरिकांनी उघड्यावर शौचास जाऊ नये.

२) पहाटे व सायंकाळी अंधार पडल्यावर गावाबाहेर, शेतात जाण्याचे टाळावे.

३) जंगलाजवळच्या शेतात एकट्याने काम करू नये.

४) शेतात वाकून किंवा बसून कामे करताना जास्त खबरदारी घ्यावी. उभ्या माणसावर वाघ हल्ला करत नाही.

५) शेतात जाताना हातात काठी, कुऱ्हाड असावी. कामे करताना मोबाइलवरील गाणी किंवा इतर कशाचा आवाज करत राहावा.

६) शेताला काटेरी, साडीचे कुंपन घालावे. बांधावर काटेरी वनस्पतीची लागवड करावी.

कोट

- गडचिरोलीच्या जंगलात आता पूर्वीसारखी बिनधास्तपणे वावरण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे इतक्या वर्षात आम्हाला काही झाले नाही, आता काय होणार? अशा गैरसमजात कोणीही राहू नये. असे असले तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. सर्वांनी हा मुद्दा समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ. किशोर मानकर,

वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त