शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

चारही जागा स्वबळावर ताकदीने लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:10 AM

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत.

ठळक मुद्देगजानन किर्तीकर यांचा निर्धार : शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. भाजपप्रती लोकांमध्ये रोष आहे. जिल्ह्यात शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या मिळून चारही जागा स्वबळावर पूर्ण ताकदनिशी लढविणार, असा निर्धार विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला.शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, नागपूर जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अहेरी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख छाया कुंभारे, संघटक अशोक धापोडकर, माजी जिल्हाध्यक्ष हरीष मने, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख डॉ. अश्विनी यादव, युवासेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, भरत जोशी, वासुदेव शेडमाके, विलास ठोंबरे, राकेश बेलसरे, राजगोपाल सुल्वावार, सुवर्णसिंग डांगी, सत्यनारायण बुर्रावार, निलकमल मंडल, अनंत बेझलवार, डॉ. श्रीकांत बन्सोड आदी उपस्थित होते.पुढे बोलताना किर्तीकुमार म्हणाले, नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या आदी समस्याने उग्ररूप धारण केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्येही भाजपप्रती रोष दिसून येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, डॉ. अश्विनी यादव, यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवसैनिकांना संबोधित केले. मेळाव्याला तालुका प्रमुख नंदू चावला, कवडू सहारे, माणिक भोयर, गुणवंत जंबेवार, गुणवंत जंबेवार, अशोक गावतुरे, आशिष काळे, रोशन नंदनवार, संदीप दुधबळे, संजय आकरे, प्रशांत किलनाके, सुनंदा आतला, नवनाथ उके, नगरसेविका अनिता बोरकर, चित्रा गजभिये यांच्यासह बाराही तालुक्यातून तीन हजार शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार१९९५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना हा सर्वात प्रबळ पक्ष होता. या पक्षाचे आमदार सुध्दा निवडून आले. याच कालावधीत आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाल्याने पक्षाला थोडीफार मरगळ प्राप्त झाली. आता मात्र पुन्हा बुथ स्तरावरून बांधणी केली जाणार आहे. पूर्व विदर्भातील सहा लोकसभा व ३६ विधानसभा स्वतंत्र लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाच्या अंदाजानुसार यापैकी चार लोकसभा व २० विधानसभेच्या जागांवर मध्ये यश मिळेल. २०१४ मध्ये भाजपाचे वादळ होते. आता मात्र हे वादळ शमले आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगली संधी आहे, असा विश्वास गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना