स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीत ग्रामपंचायत हा सर्वांत खालचा घटक असला तरी गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आता केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट निधी जमा करण्याचे धाेरण अवलंबिले आहे. नवीन पिढी ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष देण्यास सुरुवात केल्याने ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे.
चार वर्षांपूर्वी सरपंच व सदस्यांना केवळ बैठक भत्ता दिला जात हाेताे. मागील सरकारने सरपंच व उपसरपंचासाठी मासिक मानधन सुरू केले आहे. सदस्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच बैठक भत्ता दिला जात आहे. याबाबत सदस्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. सरपंच, उपसरपंचांसाेबतच सदस्यसुद्धा गावाच्या विकासासाठी वाहून घेतात. त्यामुळे सदस्यांनाही मानधन देण्याची मागणी आहे.
काेट
सरपंचाला किमान दहा हजार रुपये तर सदस्यांना दोन हजार रुपये मासिक मानधन देण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण शासनाकडे
मागणी करू. -कुंतीबाई हुपुंडी, सरपंच, बेतकाठी