दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईट एकाच नमुन्यात बनल्या आहेत. या नवीन लूकमध्ये विविध प्रकारची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर या कार्यालयाच्या अंतर्गत अनेक कार्यालये येतात. योजना व कार्यालयांची माहिती नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र वेबसाईट बनविण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा आयटी विभाग स्वत: वेबसाईटचे डिझाईन करीत होता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट वेगवेगळी राहत होती. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीला वेबसाईट बघायची असेल तर माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत होती. ही बाब केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट एका ठराविक साचात बनविण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. जवळपास दोेन महिने काम चालले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच वेबसाईट पूर्णपणे अपडेट होऊन सुरुवात झाली आहे.नागरिकांसाठी उपयुक्त माहितीसदर वेबसाईटवर जिल्ह्याचा इतिहास, जिल्ह्याचा नकाशा, जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या अधिकाºयांची माहिती, प्रशासकीय रचना, जनसांख्यिकी, अर्थ व्यवस्था, नद्या, हवामान याची माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापन, हेल्पलाईन, सार्वजनिक सुविधा, शासनाचे विविध विभाग, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जनगणना, नागरिकांची सनद, जिल्ह्यातील भरती, कामांची निविदा आदीबाबतची माहिती सदर वेबसाईटमध्ये टाकण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने सदर साईट उघडल्यास त्याला जिल्ह्याची बहुतांश माहिती मिळण्यास मदत होणार आहे.अशी आहे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वेबसाईटगुगलवर ‘गडचिरोली डॉट निक इन’ टाईप केल्यानंतर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट उघडते. या वेबसाईटच्या मुखपुष्ठाच्या डाव्या बाजूला सत्यमेव जयतेचा राष्ट्रीय प्रतीक दिसतो. त्याच्या बाजूला गडचिरोली असे लिहिण्यात आले आहे. उजव्या बाजूला डिजिटल इंडियाचा लोगो ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याविषयीची माहिती, निर्देशिका, विभाग, पर्यटन, दस्तावेज, सूचना, माहिती अधिकार, अर्ज, नागरिक सेवांबाबत माहिती उपलब्ध आहे. अगदी पहिल्या स्लाईडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे छायाचित्र त्यानंतर सेमाना उद्यान, वन वैभव आलापल्ली, कमलापूर येथील हत्ती कॅम्प, सोमनूर येथील त्रिवेणी संगमाचे विहंगम दृश्याचे छायाचित्र दिसते. त्याखाली लोकप्रतिनिधी, महत्त्वाचे दूरध्वनी, शासन निर्णय, पर्यटन, जिल्ह्यातील गैर सरकारी संस्थांच्या माहितीची लिंक आहे. त्याचबरोबर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे छायाचित्र आहे.सर्वात खाली पीएम इंडिया, पंतप्रधान सहाय्यता निधी, माझे सरकार, मेक इन इंडिया, इनक्रेडिबल इंडिया व डिजिटल इंडियाचे लोगो टाकून लिंक देण्यात आली आहे. सदर लोगोवर क्लिक करताच संबंधित विभागाचे वेबसाईट उघडते.
वेबसाईट नव्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:10 AM
केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईट एकाच नमुन्यात बनल्या आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : देशभरातील वेबसाईट एकाच ढाच्यात