अंकिसा : आसरअल्ली समूह साधन केंद्राच्यावतीने २९ जून राेजी शैक्षणिक सभा घेण्यात आली. या सभेनंतर गावातील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गृहभेटीद्वारे करण्यात आले. सभेत प्रामुख्याने १०० टक्के विद्यार्थी दाखल करणे, शालेय पाेषण आहाराकरिता बँक खाते उघडणे, पाठ्यपुस्तके परत घेणे व वितरित करणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण सर्व्हे करणे, शाळा बाहेरची शाळा फाॅर्म भरणे, शालार्थ वेतन फाॅर्म भरणे, शिक्षक वर्गणीतून केंद्रात वायफायची व्यवस्था करणे, चेतना कार्यक्रम पंधरवडा राबविणे, केंद्रस्तरीय मंत्रिमंडळ स्थापन करणे, प्रत्येक शाळेत फेसबुक व यू-ट्युब चॅनल तयार करणे, आसरअल्ली येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के होण्यासाठी रॅली काढून व प्रत्यक्ष गृहभेटी देऊन शिक्षण व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्याबाबत चर्चा झाली. तसेच लसीकरणाबाबत गावात जनजागृती करण्यात आली. लसीकरण झालेल्या नागरिकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक सुरेश चुधरी व शिक्षकवृंद उपस्थित हाेते.
आसरअल्ली येथे नवागतांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:25 AM