लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पूर्व विदर्भात शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ७५० कोटी रुपयांची हानी झाली असून त्या मदतीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारचे पथकही पाहणी करून गेले. अजून एकदा ते पथक पाहणी करण्यासाठी येऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकार आपली मदत देईल.कोरोनामुळे आर्थिक मदतीवर काही मर्यादा असल्या तरीही केंद्र सरकारकडून येणाऱ्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार पूरग्रस्तांना आपल्या वाट्याची मदत लवकर देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही मदत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:21 PM
गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देकेंद्राकडे ७५० कोटींची मागणी