शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:19 AM

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचाºयांसंदर्भात गेल्या ९ फेब्रुवारीला काढलेल्या परिपत्रकातील अटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाभरातून आलेल्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. यावेळी विविध लक्षवेधी नारे देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...

ठळक मुद्देगडचिरोलीत गुंजले लक्षवेधी नारे : शासन परिपत्रकाविरूद्ध जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचारी एकवटले

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचाºयांसंदर्भात गेल्या ९ फेब्रुवारीला काढलेल्या परिपत्रकातील अटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाभरातून आलेल्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. यावेळी विविध लक्षवेधी नारे देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडण्यात आली.‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते’, ‘एकच नारा कायम करा,’ ‘रद्द करा रद्द करा, जाचक परिपत्रक रद्द करा’, अशा राज्य सरकारला उद्देशून दिलेल्या कंत्राटी कर्मचाºयांच्या व्यथा मांडणाऱ्या नाऱ्यांसोबतच ‘सरकारला आमचं सांगणं हाय, २०१९ ला निवडणूक हाय’ असा सूचक इशारा देणारा नाराही मोर्चादरम्यान लावला जात होता. गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा भर उन्हात ३ किलोमीटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवेदन देऊन सभा घेण्यात आली.९ फेब्रुवारीला शासनाने काढलेले परिपत्रक कंत्राटी कर्मचाºयांचे हक्क आणि अधिकारांवर गदा आणणारे आहे. परिपत्रकातील जाचक अटींमुळे लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ३ ते २० वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनुभवसंपन्न कर्मचाºयांच्या कुटुंबांना रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या पदांवर या कंत्राटी कर्मचाºयांना समायोजित करून नियमित करावे अशीही मागणी करण्यात आली.महाराष्टÑ राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ जिल्हा गडचिरोली या संघटनेच्या माध्यमातून सर्व कंत्राटी कर्मचारी एकत्र आले. या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष वकील खेडकर, उपाध्यक्ष प्रकाश लाडे, कार्याध्यक्ष मनोहर वाकडे, सचिव प्रशांत बांबोळे, सहसचिव राकेश बरडे, जितेंद्र कोटगले, स्वाती लांजेवार, भुमेश्वरी वाढई, रवींद्र राऊत यांनी केले. आंदोलनाला जि.प.कर्मचारी महासंघ शिक्षक परिषद, ग्रामसेवक युनियन, शिक्षक संघ, भारीप बहुजन महासंघ, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी पाठींबा दर्शविला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी शासनाच्या ९ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.