गडचिरोली : वाढत्या उन्हामुळे साप दिसण्याचे प्रमाण वाढते. शहराच्या विविध भागातून सापांची सुटका सर्पमित्रांद्वारे केली जाते. भर उन्हाळ्यातही साप बाहेर का पडत आहेत? हा प्रश्न आहे. याबाबत सर्पमित्र काय सांगतात, हे जाणून घेऊया.
उष्णता वाढल्याने साप बाहेरसध्या उष्णतामानात कमालीची वाढ झाली आहे. तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हिरवी वनस्पती नष्ट होत आहे. उन्हामुळे जमिनीत उष्णता वाढत आहे. यामुळे सरपटणारे प्राणी, साप, विंचू तसेच अन्य जीव थंड निवाऱ्याच्या शोधात भरकटतात.
प्रत्येक साप विषारी नसतोजिल्ह्यात १४ प्रकारचे बिनविषारी साप आहेत. नाग, घोणस, फुरसे, मण्यार हे विषारी साप आढळतात. विषारी समजून बिनविषारी सापांचा बळी घेतला जातो. यासाठी विषारी व बिनविषारी साप कोणते? याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
वस्ती परिसरात साप दिसल्यास कोणाशी संपर्क साधाल?शहरात तसेच गावालगत सरपटणारे प्राणी उष्णतेमुळे लोकवस्तीकडे वळतात. थंड निवाऱ्याच्या शोधात अनेकदा नागरिकांच्या घरामध्ये शिरकाव करतात. सध्या असे प्रकार वाढले असून, सर्पमित्रांकडून सापांना जीवनदान देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साप दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधावा.जिल्ह्यात विषारींसह बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आहेत. ओलावा असलेल्या ठिकाणी ते दडून असतात.
उष्णतेच्या महिन्यात काही प्रजातींचा मिलनाचा कालावधी असतो. अशावेळी घाबरून जाऊन मारण्याचा प्रयत्न करू नये. सापांना पकडण्याचा किंवा सापां छेडछाड करण्याचे प्रकार टाळावे. अधिक लोकांचा घोळका करून सापाजवळ जाऊ नये. अजय कुकडकर, सर्पमित्र