बाॅक्स
जिल्ह्यात १२० दिवस सुरू राहिले दुकाने
..............................
कर्जाचे हप्ते भरायचे कसे?
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद राहत असल्याने व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णत: बुडाला आहे. शनिवार व रविवार या दाेन दिवशी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहणार आहे. काेराेनाची पहिली लाट संपल्यावर कर्ज काढून, तर इकडून-तिकडून पैसा जमवून अनेकांनी आपला व्यवसाय पूर्ववत सुरू केला. काहींनी व्यवसायात बदल केला. आता दुकाने बंद राहत असल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिकांसमाेर निर्माण झाला आहे.
प्रतिक्रिया
उन्हाळ्यात लग्नसराईचा हंगाम राहत असल्याने व्यवसाय करण्यासाठी चांगले दिवस असतात. मात्र ऐन व्यवसायाच्या कालावधीत काेराेना लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. विविध गरजा व आर्थिक व्यवसाय आता कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- उज्ज्वला करपे, गृहिणी
काेराेनाच्या पहिल्या लाटेने व्यावसायिकांचे कंबरडे माेडले. पुन्हा हिंमत करून अनेकांनी व्यवसाय पूर्ववत सुरू केला. मात्र पुन्हा काेराेना संसर्गाने डाेके वर काढले. याचा फटका आमच्या व्यवसायांना बसत आहे.
- स्मिता चरडुके, गृहिणी
आमचे कुटुंब पूर्णत: व्यवसायावर आहे. मात्र आता दुकाने बंद राहत असल्याने आर्थिक मिळकतीला ब्रेक लागला आहे. गेल्या चार-पाच महिन्यापासून व्यवसाय सुरू असल्याने कर्जाचे हप्ते व उदरनिर्वाह याेग्यरीत्या सुरू हाेता. मात्र आता पुन्हा आर्थिक अडचण भासणार आहे.
- नेहर्षा मांदाळे, गृहिणी