धानोरा : आमदार डॉ. देवराव होळी हे मुरांडा येथील लाख लागवड पाहण्यासाठी जात असताना त्यांचे वाहन जंगलात अर्ध्या रस्त्यातच फसल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मुरांडा (रिठ) येथील शेतकऱ्यांनी केलेल्या लाख लागवडीची पाहणी करण्यासाठी आ. डॉ. देवराव होळी गेले होते. मुरांडा गावापासून लाख लागवडीच्या क्षेत्राकडे जात असताना आमदारांचे वाहन फसले. सदर क्षेत्र अतिसंवेदनशील असल्याने याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांना देऊन सुरक्षा पुरविण्याचे आवाहन केले. मात्र पोेलीस घटनास्थळी पोहोचले नाही. ग्रामस्थांनी प्रयत्न करून सदर वाहन बाहेर काढले. यावेळी आमदारांसोबत चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे उपस्थित होते. पोलिसांनी मदत न केल्याने आ. डॉ. देवराव होळी यांनी पोलिसांप्रती नाराजी व्यक्त केली.
मुरांडा जंगलात फसले आमदारांचे वाहन
By admin | Published: September 14, 2016 1:49 AM