बाॅक्स.....
दर दिवशी ७.५ लाखांचे उत्पन्न
गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यातील ४९ बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. सर्वच मार्गांवर आता बसेस सुरू आहेत. दर दिवशी ३४ हजार किमी बसेस चालतात. त्यातून ७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. बसफेऱ्या पूर्वीएवढ्याच साेडण्यात येत असल्या तरी उत्पन्न मात्र कमी मिळत आहे.
बाॅक्स...
शनिवार, रविवारच्या सुटीचा फटका
राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत. या सर्व कारणांमुळे बसचे प्रवासी कमी झाले आहेत.
काेट......
मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर बसेस नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच नांदेड, गाेंदियाा, मानपूर, चिमूर, उमरखेड या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू झाल्या आहेत. पूर्वीएवढ्याच बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र आता प्रवासी कमी प्रमाणात मिळत आहेत.
मंगेश पांडे,
एसटी आगारप्रमुख, गडचिराेली