लखमापूर-हळदी माल सदर मार्गावरून एस. टी. महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करत असतात. या पुलाची उंची १० ते १५ फूट आहे. हा नाला वैनगंगा नदीला जोडला असून, पूल आणि नदी यामधील अंतर एक कि. मी. आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो. परिणामी या भागात पाऊस नसला तरी पुलावरील पाणी उतरत नाही. नाल्याच्या पलीकडील हळदी, गणपूर, मुधोली आदी गावांतील मजूर याच मार्गाने पावसाळ्यात धान रोवणीसाठी लखमापूर बोरी येथे येतात तसेच अन्य गावांतील नागरिक लखमापूर बोरीला विविध कामांनिमित्त येतात. हळदी, गणपूर, जैरामपूर, येनापूर येथील विद्यार्थी याच मार्गाने चामोर्शी व लखमापूर बोरी येथे शिक्षणासाठी येतात. हा पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होतो. त्यामुळे येथे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.
हळदी मालजवळ उंच पूल केव्हा बांधणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:46 AM