गडचिराेली : शहरातील प्रत्येक घरापर्यंत गॅस सिलिंडर पाेहाेच करणाऱ्या डिलिव्हरी बाॅयचे लसीकरण प्राधान्याने हाेणे आवश्यक हाेते. मात्र, शहरातील ५० टक्केही डिलिव्हरी बाॅयचे लसीकरण झाले नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिराेली शहरात एचपीच्या दाेन, भारत गॅसची एक अशा एकूण तीन गॅस एजन्सी आहेत. या तीन एजन्सीच्या माध्यमातून गडचिराेली शहर व तालुका तसेच नजीकच्या सावली तालुक्यातही गॅसचे वितरण केले जाते. यासाठी तीनही एजन्सीकडे ५० पेक्षा अधिक डिलिव्हरी बाॅय व वाहनचालक कार्यरत आहेत. प्रत्येक घरी सिलिंडर पाेहाेचवून देण्याचे महत्त्वाचे काम डिलिव्हरी बाॅयकडून केले जाते. काेराेनाच्या संकटातही हे काम अविरतपणे सुरूच आहे. त्यामुळे गॅस डिलिव्हरी बाॅय व गॅस एजन्सीच्या इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाेणे आवश्यक हाेते. मात्र, अनेकांचे लसीकरण अजूनपर्यंत झाले नाही.
बाॅक्स...
पाच डिलिव्हरी बाॅय पाॅझिटिव्ह
गॅस सिलिंडरचे वितरण करताना पाच डिलिव्हरी बाॅय काेराेना पाॅझिटिव्ह आले. ज्याच्या घरी काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आहे, अशाही घरी सिलिंडर नेऊन द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे काम अतिशय धाेकादायक असल्याने त्यांचे लसीकरण हाेणे आवश्यक आहे.
बाॅक्स...
सिलिंडर सॅनिटाइजकडे दुर्लक्ष
गॅस सिलिंडर वेगवेगळ्या ठिकाणांवरून घरापर्यंत पाेहाेचतात. यासाठी अनेकांचे हात लागतात. त्यामुळे प्रत्येक सिलिंडर सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. मात्र, एजन्सीधारक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका डिलिव्हरी बाॅयसह नागरिकांनाही आहे.
बाॅक्स..
लसीकरण झालेच नाही
गडचिराेली शहरात डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करणारे बहुतांश जण ३५ वर्षांच्या आतील आहेत. १८ ते ४४ या वयाेगटातील लसीकरण सध्या बंद आहे. त्यामुळे आम्हाला लस मिळाली नाही. ४५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्यांनी लस घेतली आहे.
- डिलिव्हरी बाॅय
बाॅक्स...
शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - २१,६२४
गॅस वितरण करणाऱ्या एजन्सी - ३
घरपाेच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - ५४
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डाेस - ११
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डाेस - २
एकही डाेस न घेणारे कर्मचारी किती - ४३
बाॅक्स....
जबाबदारी काेणाची....?
गॅस डिलिव्हरी बाॅयचे महत्त्व ओळखून त्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, त्यांचे लसीकरण झाले नाही. बहुतांश डिलिव्हरी बाॅय ४५ वर्षांच्या आतील आहेत. जिल्ह्यात अजूनपर्यंत त्यांचे लसीकरण झाले नाही.