गडचिराेली : ऑटाे रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदतीची घाेषणा करून आता २० दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र, शासनाने अजूनपर्यंत एकाही ऑटाेरिक्षा चालकाला मदत दिली नाही. संचारबंदी हटल्यानंतर मदत मिळणार काय, असा प्रश्न ऑटाे रिक्षाचालकांकडून व्यक्त केला जात आहे.
काेराेनाचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली. संचारबंदीमुळे अनेक घटकांचा राेजगार हिरावला गेल्यामुळे शासनाने काही घटकांना आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये ऑटाे रिक्षाचालकांचाही समावेश आहे. संचारबंदीमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. हा वर्ग अतिशय गरीब आहे. दैनंदिन मजुरी करून पाेट भरते. रिक्षा बंद असल्याने दरदिवशीची कमाई बंद झाल्याने संसाराचा गाडा हाकणे अनेकांना कठीण झाले आहे. ऑटाे रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत पुरेशी नाही. मात्र, ‘बुडत्याला काठीचा आधार’ असे समजून रिक्षाचालकांनी काेणताही विराेध न करता मदत स्वीकारण्यास तयार झाले. मात्र, २० दिवसांचा कालावधी उलटत चालला तरी जिल्ह्यातील एकाही ऑटाे रिक्षाचालकाला मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे कामगार, निराधार आदी वर्गाच्या बँक खात्यात शासनाने मदत टाकली आहे. मात्र, ऑटाे रिक्षाचालक यापासून वंचित आहेत.
सध्या संचारबंदी असल्याने कमाई ठप्प आहे. त्यामुळे आता खरी पैशांची गरज आहे. मात्र, या कालावधीत पैसे मिळणार न मिळता संचारबंदी उठल्यानंतर या मदतीचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाच्या धाेरणाबाबत रिक्षाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने इतर घटकांप्रमाणेच ऑटाे रिक्षाचालकांनाही तत्काळ मदत करावी, अशी मागणी जिल्हाभरातील ऑटाे रिक्षाचालकांकडून हाेत आहे.
काेट..
आर्थिक मदत मिळविण्यासाठी ॲपवर ऑनलाइन नाेंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र अजूनपर्यंत काेणते ॲप आहे. नाेंदणी कशी करायची, काेणती कागदपत्रे लागणार आहेत, याची काेणतीच माहिती रिक्षाचालकांना उपलब्ध नाही. अजूनपर्यंत एकालाही मदत मिळाली नाही.
- गाेकुळ मेश्राम, गडचिराेली शहर परवाना ऑटाे संघटना अध्यक्ष
काेट...
रिक्षाचालक हा अतिशय गरीब असलेला वर्ग आहे. दर दिवशीच्या मिळकतीवर संसार चालते. आता मिळकत बंद असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. काेराेना रुग्णांनाही पाेहाेचविण्याचे काम रिक्षाचालक करीत असल्याने त्यांना ‘काेविड याेद्धा’ घाेषित करून मदत देण्याची गरज आहे.
- राजू भारती, गडचिराेली बसस्थानक ऑटाे संघटना अध्यक्ष
बाॅक्स...
महाआयटीचे पाेर्टल तयार हाेणार
ऑटाे रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने ७ मे राेजी शासननिर्णय काढला आहे. त्यामध्ये परवानाधारक ऑटाे रिक्षांची नाेंदणी करण्यासाठी महाआयटीमार्फत स्वतंत्र पाेर्टल तयार केले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा हाेणार आहे. राज्यात ७.२० ऑटाेरिक्षाचालक आहेत. त्यासाठी १०८ काेटी रुपये अनुदान द्यावे लागणार आहे.