धानाेरा तालुक्यातील रांगी, बाेदीन, मुरुमगाव परिसरातील काही गावांमधून जाणारे रस्ते अद्यापही कच्च्या स्वरूपात आहेत. या रस्त्यांचे पक्के बांधकाम केव्हा हाेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. जे रस्ते ८ ते १० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. ते रस्ते सध्या पूर्णत: उखडले आहेत. यातील एक रस्ता साेडे-गुजनवाडी मार्ग हाेय. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. गुजनवाडी परिसरातील नागरिक धानाेरा येथे नेहमी ये-जा करीत असतात. जवळपास सात ते आठ गावांतील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. याशिवाय गडचिराेली तालुक्याच्या मुरमाडी परिसरातील अनेक नागरिक धानाेरा येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. ३ वर्षांपूर्वी या मार्गाची निर्मिती करण्यात आली हाेती. काही वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या रस्त्यांची ही स्थिती आहे, तर ज्या रस्त्यांचे केवळ खडीकरण झाले हाेते, ते रस्ते दुरवस्थेत आहेत.
वासुदेव उसेंडी, धानाेरा
(तक्रार-गाऱ्हाणी या सदरासाठी आपल्या परिसरातील सार्वजनिक समस्या लिहून लोकमत कार्यालय, त्रिमूर्ती चौक, गडचिरोली येथे पोस्टाने, प्रत्यक्ष येऊन किंवा ९४०४८५४६९४ या क्रमांकावर व्हॉट्स ॲपने पाठवू शकता)