सनशाईन, सुविधा आणि शिफा चौधरी या तीन प्रकरणांचा बऱ्यापैकी छडा लावण्यात आला. त्यातील काही आरोपी अटकेत आहेत तर काही अजून फरार आहेत. काही मालमत्ताही पोलिसांनी जप्त केली आहे. फरार असलेल्यांना लवकर ताब्यात घेऊन प्रकरणाचा छडा लागावा आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(बॉक्स)
आर्थिक गुन्हे शाखाच नाही
आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा असते. पण गडचिरोली जिल्ह्यात त्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नाही. त्यामुळे ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडेच (एलसीबी) दिली जाते. सद्यस्थितीत सर्व आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासह जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांचाही तपास, विशेष मोहिमा या शाखेला पार पाडाव्या लागतात.
शिफा प्रकरण चर्चेत
गेल्या ५ वर्षात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सर्वाधिक चर्चेच राहिले ते देसाईगंज येथील शिफा प्रकरण. या प्रकरणात मुख्य आरोपी शिफा राजमोहम्मद चौधरी आणि तिच्या पतीलाही पोलिसांनी अटक केली. प्राप्त माहितीच्या आधारावर देसाईगंज पोलिसांनी चार्जशीटही दाखल केली. पण या प्रकरणाचे आणखीही धागेदोरे असल्यामुळे त्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पण अजून या प्रकरणात फारशी प्रगती झाली नाही.
कोट
आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे किचकट असल्याने त्यात तपासासाठी वेळ लागतो. याशिवाय बहुतांश प्रकरणातील आरोपी बाहेरच्या राज्यातील आहेत. त्यामुळे त्यांचा शोध लागल्याशिवाय तपासाला गती येत नाही. एकावेळी अनेक प्रकरणांच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्याने कोणत्याली एका प्रकरणावर सर्व लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.
- उल्हास भुसारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा