शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

फ्रिजवाल गाई कुणाच्या? आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 6:00 AM

प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गायी मिळाल्या नाही तर उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक : तहसीलदारांनी समजूत घालत शेतकऱ्यांना केले शांत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी पुण्यावरून आणण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या फ्रिजवाल गाई आपल्यालाच मिळाव्या यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे गुरूवारी अनेक शेतकऱ्यांनी जाऊन गायींची मागणी केली. आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी वेळीच तिथे पोहोचून शेतकऱ्यांना समजावले. जिल्हाधिकारी यावर लवकरच तोडगा काढून योग्य तो निर्णय घेईल, अशी समजूत घातल्याने शेतकरी नरमले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी शनिवार दि.२१ रोजी संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली असून यात सदर गायी कोणाच्या ताब्यात राहणार यावर निर्णय होईल.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गायी मिळाल्या नाही तर उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून दिला.गेल्या सोमवारी (दि.१६) देसाईगंज तालुक्यातील वळू माता संगोपन केंद्रात झालेल्या बैठकीत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचे भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. कंपनीने त्यांच्याकडील गायी शेतकऱ्यांना देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चापोटी प्रतिगाय १९ हजार ५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची अट टाकली. परंतू शेतकऱ्यांनी एवढे पैसे देण्यास ठाम नकार दिला.यावर तोडगा काढण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांच्यासह फार्मर्स कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि दि.१६ च्या बैठकीत शेतकऱ्यांनी निवडलेले पाच प्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीसोबतच पशुसंवर्धन विभागाच्या गाई वळू माता केंद्रात १०० फ्रिजवाल गाई देण्यात आल्या आहेत. त्या गायीसुद्धा शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार का? याबद्दल शेतकऱ्यांमध्ये औत्सुक्य आहे. याबाबतही शनिवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.प्रतिगाय ५ हजारांचा खर्च देण्यास तयारप्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने पुण्यावरून सदर गाई आणून दोन महिने त्यांचे संगोपन केले. त्याचा खर्च म्हणून प्रतिगाय ५ हजार रुपयापर्यंत खर्च देण्याची तयारी काही शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. मात्र कंपनीचे संचालक म्हणतात त्याप्रमाणे २० हजार रुपयांचा खर्च हा अवाजवी असून तो देण्यास शेतकऱ्यांनी असमर्थता दर्शविली आहे. ज्या गाई मरण पावल्या त्याची जबाबदारी कोणाची हे निश्चित करून कंपनीच्या संचालकांनी योग्य देखभाल केली नसल्यामुळेच त्या महागड्या गाई मृत्यूच्या खाईत लोटल्या गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या गायींचा वेळीच विमा उतरविला असता तर नुकसानभरपाई मिळाली असली. पण कंपनीच्या चुकीमुळे त्यापासूनही वंचित राहावे लागत असल्याचे शल्य शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :cowगाय