लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खासगी कंपन्यांकडील बियाणे अतिशय महाग राहते. हे बियाणे खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य हाेत नाही. घरच्या बियाण्यांवर पेरणीपूर्वी याेग्य ती प्रक्रिया केल्यास या बियाणांची उगवण क्षमता वाढण्यास मदत हाेते. पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बियाणांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा दर्जा चांगला राहत असला तरी हे बियाणे तीनपट महाग राहते. एका एकरासाठी जवळपास एक हजार रुपयांची बॅग खरेदी करावी लागते. दहा एकर शेती असेल तर बियाणांचा खर्च दहा हजारांच्या वर जातो. एवढा खर्च करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य हाेत नाही. घरच्या धानाची काळजी घेऊन प्रकिया केल्यास हजाराे रुपये वाचतील.
किमान दाेन बांध्या दत्तक घ्या- शेतातील दाेन बांध्या दत्तक घ्याव्यात. या धानाची याेग्य काळजी घ्यावी. या बांधीतील खबरे धानाची वेळाेवेळी काढणी करावी. कापणीनंतर धानाचे भारे वेगळे ठेवावे. - यंत्राने मळणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी. इतर धान भेसळ हाेऊ नये, यासाठी आपल्याच शेतातील इतर धानाची मळणी प्रथम करावी. त्यानंतर बियाणांसाठी वापरले जाणाऱ्या धानाची मळणी करावी.
पातळ राेवणी करादाट राेवणीमुळे धानावर तुळतुळा व इतर राेगांचा प्रादुर्भाव हाेण्याचा धाेका राहते. त्यामुळे प्रत्येक चुडीत दाेन ते तीन राेपांची लागवड करावी. दाेन ओळीत १५ ते २० सेंटीमीटरचे अंतर असावे. दहा ओळीनंतर १ फुटाचे अंतर साेडावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत हाेते. तसेच याच साेडलेल्या जागेतून फवारणी, खत टाकणे आधी कामे करता येतात.
६० टक्के बियाणे वापरादुकानातून खेरेदी करून आणलेले बियाणे दाेन वर्ष वापरू शकतात. शेतकऱ्यांनी ६० टक्के बियाणे घरचे वापरावे तर ४० टक्के बियाणे खरेदी करावे. यामुळे बराच खर्च वाचताे. घरच्या बियाणांवर पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. राेपे सुदृढ असल्यास पीक चांगले येते. धानाचे बियाणे लागवडीसाठी शक्यताे बेड तयार करावा.- प्रदीप वाहने, तालुका कृषी अधिकारी, गडचिराेली
६० टक्के बियाणे घरचे वापराकृषी विभागाच्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी दरवर्षी ४० टक्के बियाणे खरेदी करावे, तर ६० टक्के बियाणे घरचे वापरावे. जे बियाणे खरेदी केले ते दाेन वर्ष वापरता येतात. दाेन वर्षानंतर बियाणे बदलावे.