आॅनलाईन लोकमतधानोरा : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अनुकंपातत्त्वावरील ज्येष्ठता यादीमध्ये व रिक्तपदाच्या भरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्टÑवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद देविकर यांनी निवेदनातून केली आहे. अनुकंपाधारकांच्या भरती प्रक्रियेत विधवा महिलेस वगळल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.अनुकंपधारकांच्या यादीनुसार असवंती आनंद राऊत यांचे पती आनंद राऊत हे २२ एप्रिल २०१३ ला ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे कक्षसेवक पदावर कार्यरत असताना २२ एप्रिलला त्यांचे निधन झाले. दिलीप ठाकरे हे सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सेवेवर असताना २७ डिसेंबर २०१४ रोजी मृत्यू पावले. ज्येष्ठता यादीनुसार असवंती राऊत हे तिसºया क्रमांकावर तर मनीष दिलीप ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर होते. १ जुलै २०१६ ला सदर अनुकंपधारकांच्या पदभरतीमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या मनीष दिलीप ठाकरे यांचे नाव ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट केले. नियमाचे उल्लंघन करून असवंती आनंद राऊत या विधवा महिलेवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच विधवा महिलेस न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रमोद देविकर यांनी मुख्यमंत्री, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
विधवा महिलेस भरतीतून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:32 PM
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अनुकंपातत्त्वावरील ज्येष्ठता यादीमध्ये व रिक्तपदाच्या भरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्टÑवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद देविकर यांनी निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देअनुकंपाधारकांची भरती : माहितीच्या अधिकारात उघड