देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारत बांधकामाची समस्या व विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्यांचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित स्वरूपाचे असल्याने, याबाबत शासनाकडे निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली. मात्र, यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर कुरुड येथील शाळा व्यवस्थापन समितीने येत्या २ मार्च, २०२१ रोजी आंदोलन करण्याचे निर्णय घेतला होता, परंतु सकाळी १० वाजे जिल्हा परिषद शाळा कुरुड येथे बैठक घेऊन प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर, शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलन रद्द केले. दरम्यान, बैठक घेऊन प्रशासनाकडून काम लवकर सुरू करू, असे अश्वासन दिल्यानंतर अखेर आंदोलन रद्द करण्यात आले. कुरुड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये वर्ग खोल्यांचा अभाव असल्याने सहा खोल्यांमध्ये १२ वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये शाळेसाठी इमारतीचे नूतनीकरण बांधकाम मंजूर करण्यात आले. वर्क आदेश २०२१मध्ये मिळाला होता, तर बांधकामाची रक्कम १८.८६ लक्ष असून, काही दिवसांत कंत्राटदारामार्फतीने बांधकामास सुरुवात करण्यात आली. मात्र, बांधकामावरील उर्वरित रक्कम शासन स्तरावरून मिळत नसल्याने साहित्य खरेदी वा इतर खर्च कुठून करावा, असा प्रश्न कंत्राटदाराला पडला. शेवटी शाळेच्या नूतनीकरण्याचे बांधकाम बंद करण्यात आले. हे बांधकाम मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने, शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शासनाला याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून व निदर्शनास आणून देऊनही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात. मात्र, २ मार्चला प्रशासनाचे अधिकारी येऊन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांची बैठक घेऊन १५ मार्चपर्यंत उर्वरित निधी उपलब्ध करून काम सुरू करू, असे अश्वासन समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता भरडकर यांनी दिले. यावेळी प्रभारी गट शिक्षणधिकारी कुचिक, महिला बालकल्याण सभापती रोशनी पारधी, पंचायत समिती सदस्य अर्चना ढोरे, कुरुड येथील सरपंच प्रशाला गेडाम, उपसरपंच क्षितिज उके, मुख्याधापिका पराते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवलाजी राऊत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विलास गोटेफोडे, सुनील पारधी, ग्रा.पं. सदस्य अविनाश गेडाम, विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके, किशोर मेश्राम हजर होते.
निधी उपलब्ध करून काम पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:08 AM