लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : मुक्तिपथ, इंदिरा महिला ग्रामसंघ व व्ही.एस.टी.एफ.च्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोपरअली चेक येथे महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावात विधानसभेची निवडणूक ही दारूमुक्त करण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी केला.यावेळी मुक्तिपथचे समन्वयक गणेश पोेलगिरे, शिक्षक दादाजी सिडाम, ग्रामपरिवर्तक दिलीप शिकरे आदींनी मार्गदर्शन केले. दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती उपचार याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर गावातील महिला व शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून दारूबंदीबाबत नागरिकांमध्ये जागर करण्यात आला. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असते. त्यामुळे दारूविक्रीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार महिलांनी केला.‘आताची निवडणूक दारूमुक्त निवडणूक, गावात दारूबंदी झालीच पाहिजे, जो पाजेल माझ्या नवºयाला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असे नारे दिले. ‘जो पाजेल माझ्या बापाला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असे नारेबाजी युवक व युवतींनी यावेळी लावले. या रॅलीत इंदिरा ग्राम संघाच्या अध्यक्ष मंगला उराडे, सचिव भाऊसाहेब बालंमवार, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.महाराष्टÑ ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेल्या कोपरअली व इतर गावांमध्ये निवडणुकीच्या काळात मुक्तिपथ ाव संघटनेतर्फे दारू व तंबाखू सेवन विरोधी जनजागृती केली जात आहे. दारूविक्री विरोधातील या जागृतीला महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे.
दारूमुक्त निवडणूक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM
या रॅलीतून दारूबंदीबाबत नागरिकांमध्ये जागर करण्यात आला. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असते. त्यामुळे दारूविक्रीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार महिलांनी केला.
ठळक मुद्देमहिलांचा निर्धार : कोपरअली गावातील बैठकीत चर्चा