आंदोलन समितीची बैठककुरखेडा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी कठोर संघर्षाची भूमिका घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्णय स्थानिक नगर पंचायत भवनात बुधवारी पार पडलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह मडकाम होते. यावेळी समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये तालुका निमंत्रक डॉ. परशुराम खुणे, तालुकाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे, संघटक वामदेवराव सोनकुसरे, सचिव घिसुजी खुणे, उपाध्यक्ष किसनलाल साहळा यांचा समावेश आहे. नागपूर येथे ३ व ४ आॅक्टोबरला प्रतिविधानसभा आंदोलन व ५ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढला जाणार आहे. सभेला गडसुलवार, सातार, सय्यद तलत, रोकडे, कुमरे, कोडाप हजर होते.
विदर्भाचा लढा तीव्र करणार
By admin | Published: September 22, 2016 2:29 AM