शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

प्रलंबित कामे खपवून घेणार नाहीे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:12 AM

चामोर्शी तालुक्यात विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण व प्रलंबित स्थितीत आहेत. यामुळे आमसभेत झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही.

ठळक मुद्देचामोर्शी पंचायत समितीची आढावा बैठक : आमदारांचा अधिकाºयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यात विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण व प्रलंबित स्थितीत आहेत. यामुळे आमसभेत झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे चामोर्शी तालुक्यातील विकास कामे प्रलंबित राहता कामा नये, यापुढे तालुक्यातील प्रलंबित विकास कामे आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी दिला.आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभेची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी आ. डॉ. होळी बोलत होते. या बैठकीला पं. स. सभापती आनंद भांडेकर, जि. प. सदस्य विद्या आभारे, पं. स. उपसभापती आकुली बिश्वास, संवर्ग विकास अधिकारी खामकर, तहसीलदार अरूण येरचे, पंचायत विस्तार अधिकारी भोगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापूर्वीही आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी पंचायत समितीची आमसभा पार पडली होती. या सभेत अनेक लोकोपयोगी विकास कामांचे नियोजन करून मंजुरी प्रदान करण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निवारणही करण्यात आले होते. त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र काही महिन्यांचा कालावधी उलटूनही मागील आमसभेत घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चामोर्शी तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांना गती मिळावी तसेच झालेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, याकरिता आ. डॉ. देवराव होळी यांनी ही आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी रस्ते, वीज व इतर समस्या मांडल्या.