शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

तीन महिन्यांत सव्वा दोन हजारांवर शौचालयांचे बांधकाम होईल का पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:25 IST

रेती मिळेना, साहित्यही महागले : ३१ मार्चची डेडलाईन; लाभार्थ्यांची होतेय दमछाक

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली: स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत सन २०२४- २५ या आर्थिक वर्षातबाराही तालुक्यात मिळून एकूण ४ हजार वैयक्तीक शैचालयाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, आतापर्यंत निम्यापेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले असून अजूनही सव्वा दोन शौचालयांचे काम अपूर्ण आहे. येत्या तीन महिन्यांत या सर्व शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

काही ठिकाणी अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतरही लाभार्थ्यांनी बांधकामास सुरुवात केलेली नाही. याला रेती व इतर बांधकाम साहित्याची अडचण कारणीभूत असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी येत्या ३० मार्चपर्यंत शौचालयांचे काम पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विहीत वेळेत शहरी व ग्रामीण भागातील शौचालये पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना केल्या आहे. संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या गावातील वैयक्तिक शौचालयाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बिडीओंनी दिल्या आहेत. महिन्यातून दोनदा सभा बोलावून शौचालय बांधकामाचा आढावा अधिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे.

असा आहे शौचालय बांधकामाचा तपशीलतालुका                 मंजूर शौचालये               पूर्ण कामे             अपूर्ण कामे अहेरी                          ५६८                              २३८                      ३३०आरमोरी                      ३५४                               १३३                      २२१भामरागड                    ५२९                               १२२                      ४०७चामोर्शी                       ३९८                               २८७                      १११देसाईगंज                     २०४                                १०२                      १०२धानोरा                         १६२                                ६५                        ९७एटापल्ली                      २०१                                ८१                        १२०गडचिरोली                    333                               २१०                       १२३कोरची                          २१४                               ७२                        १४२कुरखेडा                        १९६                               ९१                         १०५मुलचेरा                         ३४२                              १८०                        १६२सिरोंचा                         ६६३                               २४९                       ४१४

सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष हागणदारी मुक्त शहर व गाव हा दर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा दर्जा टिकवण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणे अनिवार्य आहे. या शौचालयांत वीज व पाणीपुरवठा करणे, दरवाजे, शौचकुपे व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यानुसार या शौचालयांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरातही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाकडून आता काय कार्यवाही केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अहेरी, भामरागड तालुका माघारला स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत अहेरी उपविभागातही शौचालयांची कामे बरीच मंजूर करण्यात आली. मात्र, या भागातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे या उपविभागात शौंचालयांच्या कामांना वेग नाही. अहेरी व भामरागड हे दोन तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ४०७ आणि अहेरी तालुक्यात ३३० शौचालयांचे काम अपूर्ण आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGadchiroliगडचिरोली