कमी खर्चात चांगले उत्पादन येत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मका पिकाकडे वळत चालला आहे. दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मक्याला चांगला भाव मिळावा म्हणून राज्य शासन आदिवासी विकास महामंडळामार्फत मक्याची मागील वर्षीपासून खरेदी करीत आहे. आधारभूत किंमत १ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल एवढी आहे. शासनाकडून चांगला भाव मिळत असल्याने यावर्षी मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले हाेते. मका पीक मे महिन्याच्या सुरुवातीला कापणीस तयार हाेते. त्यामुळे मे महिन्यातच मका खरेदी केंद्र हाेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळाेवेळी पाठपुरावा केला; मात्र केंद्र सुरू केले नाही. पैशाची गरज असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी केवळ १ हजार ४०० रुपये क्विंटल दराने व्यापाऱ्यांना मका विक्री केला आहे. आता बाेटावर माेजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे. त्यामुळे आता आदेश काढून काय फायदा, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित हाेत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी मका खरेदी केला तेच व्यापारी आता शेतकऱ्यांच्या सातबारावर मक्याची विक्री करण्याची शक्यता आहे.
आता व्यापाऱ्यांचा मका खरेदी करणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:25 AM