लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा सोमवारी घेण्यात आली. सदर आमसभेत तालुक्यातील विकास कामांच्या मुद्यावर प्रचंड गाजली. शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी पं.स. सदस्यांनी केल्यामुळे ही सभा अधिकच वादळी ठरली.या सभेला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, गीता साखरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी म्हरस्कोल्हे तसेच सर्व पं.स. सदस्य व सव ग्रामपंचायतीचे सचिव उपस्थित होते. यावेळी उपस्थित अनेक सरपंच, उपसरपंचांनी विकासाच्या कामाचा मुद्दा रेटून धरला. अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. गावातील प्रलंबित समस्या या आमसभेत अनेक सरपंचांनी मांडल्या. जिल्ह्याच्या विकासात अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजवावे, असे आमदारांनी सांगितले.
विकास कामांच्या मुद्यावर वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:33 PM
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा सोमवारी घेण्यात आली. सदर आमसभेत तालुक्यातील विकास कामांच्या मुद्यावर प्रचंड गाजली. शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी पं.स. सदस्यांनी केल्यामुळे ही सभा अधिकच वादळी ठरली.
ठळक मुद्देपं.स.ची आमसभा : कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी