लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ढिवर, भोई, केवट समाजातील युवकांनी शिकून संघटित व्हावे व संघर्ष करावा, या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले.जय वाल्मिकी युवक मंडळ आरमोरी यांच्या वतीने ढिवर, भोई, केवट समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रलाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश डायरे, क्रिष्णा मंचर्लावार, चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गेडाम, सिनेट सदस्य प्रा.योगेश्वर दूधपचारे, बाबुराव बावणे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी गेडाम, ग्रामपंचायत कोजबीच्या सरपंच वैशाली डोंगरवार, रेखा मानकर, नागोबा खेडकर, पुरूषोत्तम भोयर, महेंद्र पारसे, दिलीप पारसे, वसंत मारबते, सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी बिजराव पचारे, काशिनाथ दुमाने, सारिका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना चंद्रलाल मेश्राम म्हणाले, ढिवर, भोई, केवट समाज हा स्वातंत्र्यानंतरही प्रगतीपासून दूर राहिला आहे. या समाजाला राजाश्रय मिळाला नाही. पारंपरिक व्यवसायावर दुसऱ्या समाजाचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे ढिवर, भोई, केवट समाजातील तरूणांनी थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनात समाजाचे नेतृत्त्व करायला पाहिजे. त्यासाठी संघटन करून समाजाची ताकद वाढविली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.संचालन प्रा.सीमा नागदेवे, रमेश नान्हे, प्रास्ताविक देवानंद दुमाने, तर आभार सीताराम गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी छबील ठाकरे, मंगेश खेडकर, योगेश कांबळे, विजय कांबळे, शालू दुमाने, नंदू मारभते, संदीप मेश्राम, सुभाष मेश्राम, शरद मेश्राम, विलास शेंडे, देवेंद्र सोनकुसरे, योगेश मारभते, वामन मेश्राम, नानाजी दुमाने, देवा दुमाने, बाबुराव शेंडे, बाळकृष्ण चिंतल, शंकर नागापुरे, गुणवंत दुकाने, सरिता कांबळे, छाया दुमाने यांनी सहकार्य केले.
त्रिसूत्रीच्या वापराशिवाय समाजाची उन्नती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:17 AM
ढिवर, भोई, केवट समाजातील युवकांनी शिकून संघटित व्हावे व संघर्ष करावा, या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले.
ठळक मुद्देचंद्रलाल मेश्राम : आरमोरीत ढिवर, भोई, केवट समाजाचा परिचय मेळावा