अर्पणा नीलकंठ गुरनुले (३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. अर्पणा ही सकाळी घरातील खोलीत फरशी पुसत हाेती. विद्युत वायरिंगमध्ये बिघाड असल्याने घरातील लोखंडी आलमारी व कुलरला करंट हाेता. फरशी पुसताना तिचा हात कुलरला लागून विजेचा शॉक लागला. त्यानंतर ती बेशुद्ध पडली.
तिला उपचारासाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात आणले तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष इटनकर यांनी तिला तपासून मृत्यू घाेषित केले. या महिलेला पती, मुलगा व मुलगी आहे. कोरची येथील वीज वितरण कंपनीचे अभियंता प्रफुल्ल कुलसंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सत्यता जाणून घेतली व पंचनामा केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात पोहवा मेहतर कुमरे करीत आहेत.