२८ जून रोजी पद्मा हिच्या पोटात दुखत असल्याने, गावातील आशा वर्करने रुग्णवाहिका मिळविण्यासाठी ४ ते ५ तासांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आशा वर्कर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष पडालवार यांनी खासगी ऑटोमध्ये गरोदर मातेला घेऊन सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात आणत असताना, मेडाराम गावाजवळ आल्यावर वेदना वाढल्याने, रात्री जंगलात रस्त्यावरच प्रसूती झाली.
ही बाब आविस शाखा रायपेठाचे अध्यक्ष संतोष पडालवार यांना कळताच त्यांनी आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांना माहिती दिली. जनगाम यांनी लागलीच सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील डॉ.तुकाराम घुटे यांच्याशी संपर्क साधून प्रसूती झालेल्या माता-बाळाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, गर्कापेठा ग्रामपंचायतीचे सरपंच सूरज गावडे, संतोष पडालवार, ग्रामपंचायत सदस्य तिरुपती माणिक्याम, जांपन्ना आसामपल्ली यांनी सहकार्य केले.