शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

..अन् संतप्त गावकऱ्यांनी पेटविले लोहखनिज वाहतूक करणारे रिकामे आठ ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 11:08 AM

संतप्त नागरिकांनी सुरजागडमधील लोहखनिज वाहतूक करणारे आठ ट्रक पेटविले

मूलचेरा (गडचिरोली) : तालुक्यातील लगाम ते शांतिग्रामदरम्यान दामपूर वळणाजवळ एका दुचाकीला लोहखनिज पोहोचवून परत येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला ठार झाली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी एकापाठोपाठ येणारे आठ ट्रक पेटवून देण्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली.

लगाम येथील आठवडी बाजार असल्याने येथे परिसरातील गावांमधील लोकांची वर्दळ होती. यादरम्यान घुग्गुस येथे लोहदगड पोहोचवून आष्टीकडून परत सुरजागडकडे निघालेल्या रिकाम्या ट्रकपैकी एका ट्रकची (एमएच ३४, बीजी ८३८८) विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यात कांचनपूर येथील पती-पत्नी खाली पडले. त्यातील अंजली सुभाष जयधर (३८ वर्षे) या महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

...अन् जमावाने केले उभ्या ट्रकांना लक्ष्य

- या अपघातानंतर मार्गावरील वाहतूक बंद होती. त्या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली. काही वेळातच त्यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ८ ट्रकला लक्ष्य करीत पेटवून दिले. रात्रीपर्यंत ट्रक जळत होते.

- सध्या आष्टी ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वच वाहनांचे अपघात वाढले आहेत. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद असून आष्टी-मूलचेरा-आलापल्ली अशी वाहतूक वळविली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली