शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:07 AM

तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही.

ठळक मुद्देसमस्या संपता संपेना : अग्निशमन यंत्र लावून काम भागविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे फायर आॅडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे.नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर आॅडिट केले. त्यात अग्निशमनच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरील सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीत मोजकेच अग्निशमन यंत्र (फायर इस्टिंग्विशर) लावलेले होते. त्यापैकी ७ यंत्रांची मुदतही संपलेली होती. ही बाब न.प.च्या अग्निशमन विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने प्रत्येक मजल्यावर पुरेसे अग्निशमन यंत्र लावले आहेत. मात्र पाण्याच्या पाईपलाईनचे काम छोटे अग्निशमन यंत्र करू शकेल का, हे सांगणे कठीण झाले आहे.इमारतीच्या नकाशात दडले काय?वास्तविक सार्वजनिक वापराच्या अशा मोठ्या इमारतीत आग लागल्यास जीवित हाणी टाळण्यासाठी पाणी पुरवठा करणारी आगरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असताना या भव्य इमारतीची उभारणी करण्यापूर्वी नकाशात ती यंत्रणा होती की नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जर नकाशात नसेल तर ही चूक तत्कालीन अधिकाºयांच्या लक्षात आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.अधिकृत एजन्सीकडून फायर आॅडिट का नाही?दिवसरात्र रुग्णांचे वास्तव्य राहणाºया रुग्णालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट अधिकृत एजन्सीकडूनच करणे गरजेचे आहे. असे असताना अग्निशमन अधिकारीच नसलेल्या नगर परिषदेच्या यंत्रणेकडून झालेले फायर आॅडिट कितपत योग्य? असा प्रश्न शंका निर्माण करीत आहे. गडचिरोलीत अधिकृत एजन्सी नसली तरी नागपुरातील एजन्सीकडे हे काम देऊन भविष्यातील दुर्घटनेचा धोका टाळता येऊ शकतो.