गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात विविध प्रकारचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून दिल्या जात आहे. या कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावा व प्रशिक्षित होऊन स्वयं रोजगार उभारावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. मेळाव्याचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार, प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, जि. प. च्या समाज कल्याण सभापती रंजिता कोडाप, आरमोरीच्या तालुका अध्यक्ष डॉ. संगीता रेवतकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री स्वप्नील वरघंटे, न. प. च्या सभापती नीता उंदीरवाडे, नगरसेविका रंजना गेडाम, लता लाटकर, वर्षा बट्टे उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी पुष्पा करकाडे, वच्छला मुनघाटे, पल्लवी बारापात्रे, संघमित्रा खोब्रागडे, गीता कुळमेथे, रुमन ठाकरे यांनी सहकार्य केले.