लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : तीळसंक्रांत हा भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचा सण आहे. कुणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनाेमिलन घडविण्यासाठी उपयुक्त असलेला उत्सव आहे. भाजप कार्यकर्त्या व महिलांनी अशा प्रकारच्या सणाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा घ्यावी व त्या ऊर्जेचा उपयाेग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिराेलीच्यावतीने गडचिराेली येथे पत्रकार भवनात बुधवारी महिला मेळावा व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बाेलत हाेत्या. यावेळी अध्यक्षस्थानी मनिषा खटी हाेत्या. उद्घाटक म्हणून रश्मी खटी तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप महिला माेर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा जि.प.च्या माजी अध्यक्ष याेगीता भांडेकर उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे संचालन वर्षा शेडमाके यांनी केले.
यशस्वीतेसाठी भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, तालुकाध्यक्ष दुर्गा काटवे, नीलिमा राऊत, नंदा मांडवगडे, बेबी चिचघरे, रूमनबाई ठाकरे, लता लाटकर, वैष्णवी नैताम, रंजना भुरसे, पूनम हेमके, राेशनी बगमारे, रंजना गेडाम, अल्का पाेहणकर, वर्षा बट्टे, ज्याेती बागडे, काेमल बारसागडे, प्रतिभा चाैधरी आदी उपस्थित हाेते.