लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नव्यानेच स्थापन झालेल्या महिला व बाल रूग्णालयालाही रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विशेष करून वर्ग ३ व वर्ग ४ ची सुमारे ५९ पदे रिक्त आहेत.स्थानिक इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर महिला व बाल रूग्णालय सुरू झाले आहे. १०० खाटांची व्यवस्था असलेल्या या रूग्णालयात महिला व बालकांसाठी दररोज बाह्यरूग्ण विभाग सुध्दा चालविला जातो. लोकार्पण करण्यापूर्वीच शासनाने डॉक्टर व नर्सची काही पदे भरली होती. त्यामुळे लोकार्पण झाल्यानंतर अगदी दुसºयाच दिवसापासून रूग्णालय सुरू झाले.महिला व बाल रूग्णालय असल्याने डॉक्टर व नर्सची पदे भरण्याला शासनाने प्राधान्य दिले. त्यामुळे डॉक्टर बहुतांश पदे भरली आहेत. महिला व बाल रूग्णालयात वर्ग १ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ पद भरण्यात आले आहे. उर्वरित ४ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२ पदे भरले आहेत. केवळ १ पद रिक्त आहे. वर्ग ३ ची एकूण ६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४७ पदे भरण्यात आली असून १९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये बालरोग सिस्टरची ८ पैकी ६ पदे रिक्त आहेत. आहार तज्ज्ञ, ब्लड बँक टेक्निशिअन, लेबॉरटरी टेक्निशिअन, सिनिअर क्लर्क, फार्मसी आॅफीसरचे प्रत्येकी एक पद व लॅब असिस्टन्टची तीन पदे अशी एकूण १९ पदे रिक्त आहेत.डॉक्टरांची बहुतांश पदे भरण्यात आली असली तरी वर्ग ३ ची पदे सुध्दा अत्यंत महत्त्वाची आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयातील काही कर्मचाºयांना महिला रूग्णालयात प्रतिनियुक्ती देऊन काम चालविले जात आहे. मात्र रूग्णालयाचा कारभार योग्य पध्दतीने चालण्यासाठी उर्वरित पदे सुध्दा भरणे आवश्यक आहे.बाह्य यंत्रणेची पदभरती रखडलीवर्ग ३ व ४ ची सुमारे २९ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरली जाणार होती. यासाठी संस्थांची निवड सुध्दा झाली आहे. याबाबतची फाईल आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात पाठविली आहे. अजूनपर्यंत पदभरती झाली नाही. बाह्ययंत्रणेमार्फत भरायच्या पदांमध्ये कनिष्ठ लिपीक, आॅपरेटर, ओटी अटेंडन्ट ची प्रत्येकी दोन पदे, स्टोअर आणि लिनन किपर, ड्रेसर, ब्लड बँक अटेंडन्ट, लॅब अटेंडन्ट, ओपीडी अटेंडन्टचे प्रत्येकी एक पद, कम्युनिटी अटेंडन्टची तीन पदे, वॉर्ड बॉयची १० पदे रिक्त आहेत. शिपायाची दोन पदे रिक्त आहेत.सहा रूग्णवाहिकांची गरजरूग्णालयात भरती होऊन सुटी झालेल्या प्रत्येक प्रसुती झालेल्या महिलेला रूग्णवाहिकेने तिच्या घरी पोहोचवून द्यावे लागते. महिला रूग्णालयात जिल्हाभरातील रूग्ण भरती होतात. गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार मोठा आहे. त्याचबरोबर भरती होणाºया रूग्णांची संख्या सुध्दा अधिक आहे. त्यामुळे या रूग्णालयाला किमान सहा रूग्णवाहिकांची गरज आहे. चार रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यापैकी दोन रूग्णवाहिका दुरूस्तीसाठी टाकल्या आहेत. दोनच रूग्णवाहिकांवर काम चालविले जात आहे. चार नवीन रूग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.रूग्णालयाला अतिक्रमणाचा वेढारूग्णालय सुरू झाल्याबरोबर रूग्णालयाच्या समोर दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. अतिक्रमणामुळे रूग्णवाहिका व इतर वाहने ये-जा करण्यास अडथळा निर्माण होतो. बांधकाम विभाग व नगर परिषदेने पुढाकार घेऊन अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.
महिला रूग्णालयालाही रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:33 AM
नव्यानेच स्थापन झालेल्या महिला व बाल रूग्णालयालाही रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विशेष करून वर्ग ३ व वर्ग ४ ची सुमारे ५९ पदे रिक्त आहेत. स्थानिक इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली.
ठळक मुद्देसामान्य रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती : वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांची सर्वाधिक पदे रिक्त