लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : मागील अनेक दिवसांपासून दारूचा महापूर असलेल्या मांगदा येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या दारूभट्ट्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी बुधवारी धाड टाकली. या धाडीत महिलांनी परिसरातील एकूण १० दारूभट्ट्यांवर शोधमोहीम राबवून मोहफूल सडवा, दारू व दारू काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य ताब्यात घेतले.मांगदा गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दारूविक्री सुरू आहे. येथील अनेक युवक दारूच्या आहारी गेल्याने महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच मुक्तिपथ अभियानांतर्गत मार्गदर्शन मेळाल्यानंतर महिलांनी एकत्र येऊन गाव संघटना गठित केली. त्यानंतर २१ जानेवारीला विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. २६ जानेवारीला प्रत्येक दारूविक्रेत्याच्या घरी भेट देऊन दारूविक्री बंद करण्यास बजावले. ग्रामपंचायतीने गावात नोटीस लावले. परंतु गावातील दारूभट्ट्या बंद झाल्या नाही. महिलांनी ३० जानेवारीला गावाच्या शिवार परिसरात शोधमोहीम राबविली असता, मोहफूल सडवा आढळून आला. सदर सडवा महिलांनी जागीच नष्ट केला. तसेच दारू काढण्यासाठी वापले जाणारे साहित्य ताब्यात घेतले. बरेच साहित्य महिलांनी नष्ट केले.याप्रसंगी आरमोरीच्या तालुका संघटक नीलम हरीणखेडे, तालुका प्रेरक प्रकाश कुनघाडकर, गाव संघटनेच्या कीर्ती नाकाडे, भूमिका कापगते, प्रिया सहारे, श्वेता काशिकर, संध्या नाकाडे, सुनंदा मेश्राम, अहिल्या नाकाडे, असवंता सहारे, ममीता नाकाडे, मंगला बावणे, मुक्ता जनबंधू, वैशाली खुणे व महिला उपस्थित होत्या.
दारूभट्ट्यांवर महिलांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 1:25 AM
मागील अनेक दिवसांपासून दारूचा महापूर असलेल्या मांगदा येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या दारूभट्ट्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी बुधवारी धाड टाकली. या धाडीत महिलांनी परिसरातील एकूण १० दारूभट्ट्यांवर शोधमोहीम राबवून मोहफूल सडवा, दारू व दारू काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य ताब्यात घेतले.
ठळक मुद्देमुक्तिपथचे सहकार्य : मांगदातील गाव संघटनेच्या महिलांची कारवाई